Sun, Aug 25, 2019 12:18होमपेज › Konkan › रोलरखाली चालकाचा मृत्यू 

रोलरखाली चालकाचा मृत्यू 

Published On: Feb 28 2018 1:15AM | Last Updated: Feb 27 2018 11:08PMकणकवली : प्रतिनिधी

नरडवे धरणाच्या भरावाचे काम सुरू असताना सुमारे 25 फूट खाली खोलगट भागात रोलर कोसळून रोलरवरील चालक शिवाजी चंद्रकांत लोकरे (30, रा. मडिलगे, भुदरगड-कोल्हापूर) हा रोलरखाली चिरडून गंभीररीत्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी कणकवलीत आणत असताना वाटेतच त्याचे निधन झाले. ही घटना मंगळवारी पावणेअकराच्या सुमारास घडली. पंधरा वर्षांपूर्वी याच धरणाच्या कामावर एका डंपरखाली चिरडून कामगाराचा मृत्यू झाला होता.

भराव सपाटीचे काम करण्यासाठी रोलरवर शिवाजी लोकरे हा काम करत असे. काम सुरू असताना त्याचा रोलरवरील ताबा सुटला आणि रोलर सपाटीकरणाचे काम सुरू असलेल्या खालच्या 25 फूट खोलगट भागात कोसळला. त्यात रोलरखाली चिरडून चालक शिवाजी लोकरे हा जखमी झाला. त्याच्या डोक्याला, छातीला दुखापत झाली.