Thu, Sep 20, 2018 14:20



होमपेज › Konkan › उद्धव ठाकरेंची सभा होणारच : खासदार राऊत (Video)

उद्धव ठाकरेंची सभा होणारच : खासदार राऊत (Video)

Published On: Apr 22 2018 10:40PM | Last Updated: Apr 22 2018 10:40PM



गिमवी (गुहागर) : लक्ष्मीकांत घोणसे पाटील

नाणार रिफायनरी विरोधातील एकजूट फोडण्याचा विरोधकांचा प्रयत्‍न असल्याचा आरोप रत्‍नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. उद्या, (दि.२३) रोजी राजापूरमधील सागवे येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्याला काही गावांनी बहिष्‍कार टाकल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

लोकांना भडकवण्याचं कारस्‍थान काही संधीसाधू लोकांकडून सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेवर ग्रामस्‍थांनी बहिष्‍कार टाकला नसून मोठ्या संख्येने लोक या सभेला येणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली. ग्रामस्‍थांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे, असेही राऊत म्‍हणाले. 

 

Tags : sindhudurg, rajapur, nanar refinery, uddhav thackeray, vinayak raut