Sat, Nov 17, 2018 15:14होमपेज › Konkan › रत्‍नागिरी : दुचाकी अपघातात मामा-भाचे ठार;  महामार्ग ठप्‍प

रत्‍नागिरी : दुचाकी अपघातात मामा-भाचे ठार;  महामार्ग ठप्‍प

Published On: Apr 14 2018 2:30PM | Last Updated: Apr 14 2018 2:30PMगिमवी(रत्‍नागिरी) : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील दिवाण खवटीजवळ दुचाकीला कंटेनरने धडक दिली. या भीषण अपघातात मामा व भाच्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्‍त गावकर्‍यांनी महामार्ग आडवला असून ३ तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्‍प आहे. 

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर खेड पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी रस्‍ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. संबंधितांनी योग्य काळजी घेतली नसल्याने हा अपघात झाल्याचा स्‍थानिक नागरिकांचा आरोप आहेत. तसेच संतप्‍त गावकर्‍यांनी ४-५ गाड्यांची तोडफोड केली आहे. 

Tags : ratnagiri, mumbai goa highway, accident