Mon, Aug 26, 2019 08:09होमपेज › Konkan › कर्नाळा येथे अपघात; एकठार

कर्नाळा येथे अपघात; एक ठार

Published On: May 16 2019 3:59PM | Last Updated: May 16 2019 6:14PM
गिमवी (गुहागर ) : प्रतिनिधी

मुंबई- गोवा मार्गावर पनवेल जवळील कर्नाळा खिंडीत आज (ता.१६)पहाटे भीषण असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात गुहागर तालुक्यातील अल्टो चालक  जागीच ठार झाला आहे. तर  इनोव्हामधील २ जण जखमी झाले आहेत.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या एमएच ४३ एएफ २२२९ या अल्टो गाडीतून बुधवारी (ता.१५) रात्री गुहागर तालुक्यातील झोंबडी गावातील गोणबरे कुटुंब डोंबिवलीला गेले.  ते पहाटे ४ वाजता पोहचले . त्यांना सोडून रझफ्फ ममतुले हा  चालक पुन्हा आपल्या गावी येत असताना हा अपघात झाला. हा तिहेरी अपघातात टँकरने अल्टो गाडीला धडक दिली तर अल्टो गाडीने इनोव्हा धडक दिली.  मात्र हा अपघात इतका भीषण होता की अल्टो गाडीचा चक्काचूर झाला आहे.

रझफ्फ ममतुले (वय २६)  हा गाडी चालक असून त्याला २ वर्षाची मुलगी व ४ वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या या अपघाताच्या बातमीने झोंबडी गावावर  शोककळा पसरली आहे.