Tue, Sep 25, 2018 03:09होमपेज › Konkan › उगाडेच्या जंगलात दोन सांबरांची शिकार 

उगाडेच्या जंगलात दोन सांबरांची शिकार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दोडामार्ग : प्रतिनिधी

तालुक्यात वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे वृक्षतोड होत आहे. शिवाय वनप्राण्यांच्या हत्यादेखील राजरोसपणे होताना दिसत आहेत. उगाडे येथील जंगलात दोन सांबराची शिकार करून शिकार्‍याने पाय व शिंगे कापून नेली. हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. यामुळे वनप्राण्यांची हत्या करून तस्करी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

उगाडे येथे वनविभागाचे वनक्षेत्र असून यालगत दोन सांबराची हत्या करून टाकण्यात आले होते. ही शिकार शुक्रवारी मध्यरात्री झाली असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्‍त केला आहे. या प्रकारामुळे तालुक्यात राजरोसपणे वन्यप्राण्यांची हत्या होत आहे. याकडे वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.