Sun, Feb 17, 2019 20:04होमपेज › Konkan › ट्रक टर्मिनसला स्थगिती देण्याची मागणी

ट्रक टर्मिनसला स्थगिती देण्याची मागणी

Published On: Dec 06 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 11:19PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नियोजित ट्रक टर्मिनसला स्थगिती द्यावी, अशी मागणी सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात करण्यात आली. या  संदर्भात कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने या प्रस्तावाला  स्थगिती देण्याची मागणी अ‍ॅड. अश्‍विनी आगाशे यांनी केली.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकशाही दिनात  एकूण 20 अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये तीन अर्ज नगर परिषद, आठ जिल्हा परिषद,  तीन पोलिस विभाग, दोन महावितरण, चार डीडीआर या विभागाशी संबंधित होते. 

याबाबत माहिती देताना निवासी जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी सांगितले की, नगरपरिषदेने साळवी स्टॉप येथे नियोजित  ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत एक अर्ज लोकशाहीदिनात आला असून या प्रस्तावाला स्थगिती देण्याची मागणी अर्जदाराने नमूद केल्याचे सांगितले. 

शहरात असलेल्या जीजीपीएस  शाळेत अव्वाच्या सव्वा डोनेशनच्या  नावाखाली पैसे घेतले जात असल्याची तक्रार एका अर्जाद्वारे करण्यात आल्याचे घोेरपडे यांनी सांगितले. याबाबत शिक्षण विभागाला चौकशी करण्याचे  आदेश देण्यात आले आहेत. 

यावेळी ते म्हणाले, ओखी वादळाबाबत जिल्ह्यात सतर्कता बाळगण्यात आली असून किनारी गावांमध्ये सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करण्यात  आहेत. याबाबत सावधगिरी बाळगताना किनारी गावात आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज केल्याची माहिती त्यांनी दिली. लोकशाही दिनाला अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्यासह  पोलिस, जिल्हा परिषद आणि  महावितरणचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. विविध विषयांचा निपटारा करण्यात आला.