Tue, Jul 23, 2019 06:20होमपेज › Konkan › तेरा कोटी वृक्ष लागवडीवर वनरक्षक व वनपालांचा बहिष्काराचा निर्णय

तेरा कोटी वृक्ष लागवडीवर वनरक्षक व वनपालांचा बहिष्काराचा निर्णय

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 08 2017 10:45PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी

महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल यांचे अन्यायकारक वेतन श्रेणीमध्ये जोपर्यंत वाढ होत नाही तोपर्यंत 13 कोटी वृक्षलागवडीवर व तसेच त्याअंतर्गत येणार्‍या सर्व कामांवर, तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेच्या नागपूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याचे पत्र सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना सावंतवाडी शाखा अध्यक्ष तथा सेवा निवृत्त विभागीय वनाधिकारी दीपक शिरोडकर, उपाध्यक्ष पृथ्वीराज प्रताप यांनी दिले.

सचिव अमित कटके, प्रमोद जगताप, सिद्धार्थ शिंदे, दत्तात्रय शिंदे, उमेश पटेकर, विशाल पाटील आदी उपस्थित  होते. 

वनरक्षक व वनपाल ही वनविभागातील महत्त्वाची पदे असून वनसंरक्षण, संवर्धन, वन्यजीव संरक्षण यामध्ये सर्वाधिक योगदान वनरक्षक व पनपाल यांचेच आहे. वनरक्षक व वनपाल यांच्या ग्रेड पे बाबत शासन वेळकाढूपणा अवलंबवत आहे. ही पदे तांत्रिक नसल्याचे कारण शासनाकडून पुढे येत असून ग्रेड पे सुधारणा होण्याबाबतची न्यायिक व रास्त मागणी शासनाने फेटाळली आहे. त्यामुळे वनविभागाच्या कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटना नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

वनविभागामार्फत कामामध्ये जलदता व सुसूत्रता येणेकामी वनरक्षक व वनपाल यांना भ्रमणध्वनीसंच पुरविण्यात आलेले होते. हे संच मुदतबाह्य झाल्याने माहिती पुरविणे शक्य होणार नाही. पीओआर ऑनलाईन करणे, ग्रीन आर्मी सदस्य बनविणे, जीपीएस रिडिंगबाबतची माहिती पुरविणे, ईमेल पाठविणे, रोपवाटिकेचे फोटो अथवा टक्केवारीची माहिती देणे, पंचनामेवेळी काढण्यात येणारे स्थळ फोटो पाठविणे आदी कामे शक्य होणार नाहीत. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारची तांत्रिक कामे करणार नसल्याचे सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.