Sun, Jul 21, 2019 16:11
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › खारेपाटण महामार्गावरील ‘सातवीण’ घेणार अखेरचा श्‍वास!

खारेपाटण महामार्गावरील ‘सातवीण’ घेणार अखेरचा श्‍वास!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खारेपाटण : रमेश जामसंडेकर

खारेपाटण गावाच्या रामेश्‍वर नगरात उताराला 200 वर्षांपूर्वीचा सातविण रस्त्याच्या कडेला उभा आहे. चैत्रपालवी आल्यामुळे रंगोत्सव सुुरू आहे. हिरव्यागार पोपटी पारदर्शक पानातून पांढर्‍या रंगाचा फुलारा आला आहे. हा राज वृक्ष सुहास घेवून दिमाखात उभा दिसतो.मात्र, आता परिसराची आणि गावाची ओळख सांगणारा हा ‘सातविण’महामार्गाच्या चौपदरीकरणात इतिहास जमा होणार आहे.

मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू असून दररोज कटरने झाडांची छाटणी केली जात असून महाकाय वृक्ष काही क्षणात आडवे झालेले पाहायला मिळत आहेत.खारेपाटणची ओळख असलेल्या साजरा बाईच्या डोंगराच्या पायथ्याशी ‘सातवीण’हा वृक्ष असून त्याच्या फुलांचा सुुंगध परिसरात दरवळतोय.चैत्र पालवीत तो ये-जा करणार्‍यांना सावली देतोय.मात्र, आता  चौपदरीकरणाच्या कामात महामार्गावरील इतर   वृक्षाप्रमाणे हा सातवीण देखीव अखेरचा श्‍वास घेणार आहे.उद्यावर आपले मरण आले असताना तो आज सुंगध देवून सुखाने जात आहे. 

गेल्या 100 वर्षांच्या कालाखंडात कणकवली, नांदगाव, कासार्डे, तळेरे, खारेपाटण, राजापूर या निसर्गरम्य टप्प्यात अनेक महाकाय वृक्ष कोण महापुरुष झाले तर कोण वाहन चालकांचे तारणहार बनले. कणकवली बसस्थानकाजवळचा वटवृक्ष म्हणजे वर्दळीचा थांबा, त्या थांब्यावर सत्यनारायण महापूजा होते. नडगिवे-वारगाव, दुस्तुरी चाळा,आदिष्टीमाता, खारेपाटण पीकअपशेड जवळचा स्वातंत्र्यपूर्व काळातील वटवृक्षाखाली पंडीत जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी थांबले. सभा बैठका झाल्या.

याच महामार्गावरील सातविणच्या बाजूला मावळा-भाचा ठिकाण असून या ठिकाणी मावळा-भाच्याचा खून झाला. त्यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध होते.एकमेकांना हात जोडून पुढे जाणारे अनेक थांबे या महामार्गामुळे नष्ट होणार आहेत. ब्रिटिशांनी रस्त्यालगत लावलेले वटवृक्ष आज प्रत्येक गावाचे थांबा बनले होते.मात्र, आता हे थांबेच माणसांसाठी पोरके ठरणार आहेत.

 

Tags : Sindhudurg, Sindhudurg news, Mumbai Goa highway, tree cutting,


  •