Mon, Mar 18, 2019 19:22होमपेज › Konkan › शिरोडा - गांधीनगर येथील तिवराच्या झाडांची अवैध तोड

शिरोडा - गांधीनगर येथील तिवराच्या झाडांची अवैध तोड

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:15PMकुडाळ : प्रतिनिधी

शिरोडा -गांधीनगर  येथे  कोळंबी  संवर्धन  प्रकल्पासाठी जेसीबी मशिनद्वारे  खारफुटी  व तिवराच्या झाडाची अवैध तोड करण्यात आली आहे. याबाबत एक जबाबदार नागरिकाने जिल्हाधिकार्‍यांना इ मेल  पाठवून लक्ष वेधले तसेच मुख्य वनसंरक्षक मुंबई, मुख्य वनसंरक्षक कांदळवन कक्ष, वनक्षेत्रपाल कुडाळ व तहसिलदार वेंगुर्ला यांना या पत्राच्या प्रती ईमेल द्वारे पाठविल्या. याची कुडाळ वनविभागाने दखल घेत व घटनास्थळी जात पंचनामा केला आहे, पण  याबाबत चौकशी होवून संबंधितांवर कारवाई होणार का? याबाबत चर्चा सुरू आहे. 

महाराष्ट्र शासन संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमातंर्गत सागरी  व खाडी क्षेत्रालगत असलेल्या कांदळवनाचे  संरक्षण करण्यासाठी  कोट्यावधी रूपयाचा निधी खर्च   केला जातो. या झाडाच्या संरक्षणाकरिता जिल्हा पातळीवर प्रशासकीय यंत्रणेची एक कमिटी कार्यरत आहे. तरी  बिनधिक्कतपणे शिरोडा गांधीनगर येथे तिवराची तोड करण्यात आली. 

तपासानंतर होणार कारवाई

कुडाळ वनविभागाने याची गंभीर दखल घेत तिवराच्या झाड तोडीचा पंचनामा केला व  चौकशी सुरू केली आहे, मात्र ही तोड मालकीची की संरक्षित क्षेत्रात आहे, याची तपासणी केल्यानंतर कारवाई केली जाईल असे कुडाळ वनक्षेत्रपाल कोकितकर यांनी सांगितले.