Mon, Nov 19, 2018 23:07होमपेज › Konkan › रत्‍नागिरीत ट्रॅव्‍हल्‍स अपघातात १४ जखमी

रत्‍नागिरीत ट्रॅव्‍हल्‍स अपघातात १४ जखमी

Published On: Mar 25 2018 8:32AM | Last Updated: Mar 25 2018 9:19AMसावर्ड (रत्‍नागिरी): वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे नजिकच्या आगवे (ता. चिपळूण) येथे आज (दि. २५ मार्च)पहाटे साडे तीनच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्‍समधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्‍याने हा अपघात झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे. 

अपघात झालेली ट्रॅव्हल्स मुंबईकडून मालवणकडे (जि. सिंधुदुर्ग) जात होती. यावेळी गाडीत २९ प्रवासी होते. अपघातातील जखमींना उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags : mumbai goa highway, ratnagiri district, agave village, chiplun taluka, travels accident