Thu, Aug 22, 2019 11:09होमपेज › Konkan › पर्यटकांची पसंती ‘कोकण डेस्टिनेशन’!

पर्यटकांची पसंती ‘कोकण डेस्टिनेशन’!

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 10:43PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

डिसेंबरमधील ख्रिसमस आणि त्याला जोडून आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांचा कालावधी, त्याचबरोबर  सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूर, मुंबई, पुण्यासह अन्य ठिकाणांहून येणार्‍या पर्यटकांसाठी कोकण किनारपट्टी आवडते डेस्टिनेशन ठरली आहे. गणपतीपुळे, दापोली, गुहागरसह सिंधुदुर्गातील तारकर्ली, देवगड, तर रायगडमधील श्रीवर्धन, अलिबाग या किनारपट्टी परिसरातील हॉटेलचे बुकिंग दीड-दोन महिन्यांपूर्वीच हाऊसफुल्ल झाले आहे.

डिसेंबर पर्यटकांसाठी पर्वणीचाच

डिसेंबर महिना म्हटलं की, पर्यटकांसाठी पर्वणीचाच असतो. नाताळ सण, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत हा योग साधण्यासाठी  पर्यटकांनी सुट्ट्यांचे काही महिन्यांपूर्वीच नियोजन केले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन उद्योगही या निमित्ताने सज्ज झाले आहेत. येथे नाताळच्या सुटीत अनेक कुटुंबे स्वतंत्रपणे येतात. फिरण्याचा स्वतंत्र कार्यक्रम आखला जातो. नववर्षाचे स्वागतही पर्यटकांकडून आपापल्या पद्धतीने केले जाते.

नाताळची सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी मुरुड, कर्दे, गुहागर, गणपतीपुळे, रत्नागिरी येथील समुद्र किनार्‍यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. यासाठी यावेळी हॉटेल, घरगुती राहण्याची सोय असलेली ठिकाणे पर्यटकांनी या आधीच हाऊसफुल्‍ल झाली आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड किनारपट्टी सज्ज झाली आहे.