Sun, Jan 20, 2019 19:33होमपेज › Konkan › तिलारी घाटमार्गातून हलक्या वाहनांची वाहतूक

तिलारी घाटमार्गातून हलक्या वाहनांची वाहतूक

Published On: Feb 06 2018 11:04PM | Last Updated: Feb 06 2018 8:50PMदोडामार्ग : प्रतिनिधी

तिलारी घाटाचे काम पूर्ण झाले असून उद्घाटनाला विलंब होत असल्याने वाहन चालकांनी अखेर घाटाच्या पायथ्याशी असलेला मातीचा ढिगारा बाजूला केला. यामुळे मंगळवारपासून घाटमार्गे लहान चारचाकी आणि दुचाकी वाहने सुरू झाली आहेत.

तिलारी घाट 7 कि.मी.चा असून तिलारी पाटबंधारे खाते आणि तिलारी जलविद्युत केंद्राने मिळून 3 कोटी 34 लाख रूपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम कोल्हापूर विभाग यांच्याकडे वर्ग केला. गेले तीन महिने घाट दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. चार दिवसापूर्वी घाटाचे काम पूर्ण झाल्याने 5 फेब्रुवारीला उद्घाटन करून घाट वाहतुकीस खुला केला जाणार होता. पण मंत्रीमहोदयांना वेळ नसल्याने उद्घाटनाची तारीख पुढे गेली आहे. घाटाचे काम पूर्ण असल्याने शेवटी वाहनचालक ग्रामस्थांनी मिळून घाटाच्या पायथ्याशी असलेला मातीचा ढिगारा बाजूला करून छोटी चार चाकी वाहने जाण्यापुरता मार्ग करण्यात आला आहे. सध्या वाहने घाटमार्गे कोल्हापूर, गोवा, बेळबाव येथे ये-जा करत आहेत. लवकरात लवकर मंत्री महोदयांनी या घाटाचे उद्घाटन करावे, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.