Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Konkan › आश्रमशाळेत तिघा सावत्र भावांवर लैंगिक अत्याचार

आश्रमशाळेत तिघा सावत्र भावांवर लैंगिक अत्याचार

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 10:35PMकोपरखैरणे : वार्ताहर

कळंबोलीतील अनाथ व निराश्रित मुलांसाठी असलेल्या ग्यान आश्रममधील तिघा सावत्र भावांवर त्याच आश्रमातील तीन केअरटेकर तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील तीन केअरटेकरवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दीपेश निकम आणि गौरव कामत या दोघांना अटक केली आहे.

पीडित मुलांमध्ये 18, 12 आणि 11 या वयोगटातील मुलांचा समावेश आहे. यातील सर्वात मोठा मुलगा गतिमंद आहे. या मुलांच्या आई-वडिलांनी दुसरे लग्‍न केले आहे. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना दोन वर्षांपूर्वी कळंबोली सेक्टर-14 मधील ग्यान आश्रममध्ये ठेवले होते. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी दीपेश निकम (वय 19), गौरव कामत (27) आणि लॉरेन्स (18) हे लहानपणापासून याच आश्रमात होते. त्यानंतर त्यांनी याच आश्रमात केअरटेकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.   डिसेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा या आश्रमातील सावत्र भावांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आले. तीन महिन्यांपासून या तिघांवर केअरटेकरकडून हे अत्याचार सुरू होते.