Wed, Apr 24, 2019 07:36होमपेज › Konkan › अडीच लाखांचे दागिने चोरणारा चोरटा गजाआड

अडीच लाखांचे दागिने चोरणारा चोरटा गजाआड

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 8:21PM

बुकमार्क करा

खेड : वार्ताहर

दापोली तालुक्यातील पिसई-वझरवाडी येथील एक घरातील अडीच लाखांच्या दागिन्यांची पेटी घेऊन मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असणार्‍या एका चोरट्याला दापोली पोलिसांनी खेड पोलिसांच्या मदतीने गुरुवारी खेड रेल्वे स्थानकात पकडले. त्याच्याकडून नऊ तोळ्यांचे दागिने व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

प्रदीप पुजारी (40, रा. कांदिवली मुंबई) असे या चोरट्याचे नाव आहे. दि. 14 डिसेंबर रोजी त्याला खेड आणि दापोली पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला पकडले. दापोली तालुक्यातील पिसई वझरवाडी येथील संजीवनी संदीप गायकर यांच्या हा ओळखीचा आहे. मूळचा कांदिवली येथील रहिवासी असला तरी शेतातील कामे करण्यासाठी कामगार म्हणून तो त्यांच्याकडे येऊन काही दिवस राहात असे. 14 डिसेंबर रोजी संजीवनी गायकर  या आधार कार्ड काढण्यासाठी दापोली येथे गेल्या असता व घरात कोणीही नाही याचा फायदा घेऊन प्रदीप पुजारी याने घरातील दागिने ठेवलेली पेटी  लांबवली. 

गायकर यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून त्याला खेड पोलिस स्थानकात पकडले. गायकर यांच्या घरातील या पेटीमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कानातले दागिने, बांगड्या, रिंगा असा तब्बल 9 तोळे सोन्याचा ऐवज तसेच 4 हजार रुपये रोख रक्कम होती.