Thu, Nov 15, 2018 09:33होमपेज › Konkan › कोटींच्या कामाला डांबरच नाही

कोटींच्या कामाला डांबरच नाही

Published On: Apr 28 2018 10:59PM | Last Updated: Apr 28 2018 10:38PMदापोली : प्रतिनिधी

टेटवली ते उन्हवरे असा 11.5 किमीचा रस्ता अर्थसंकल्पामधून मंजूर झाला आहे. या रस्त्याला 2 कोटी 80 लाख इतका निधी खर्च पडणार आहे. मात्र, प्रत्यक्ष सुरू झालेल्या कामाला डांबरच नसल्याचे रस्त्याच्या कामावरून दिसत आहे. याबाबत  येथील ग्रामस्थांनी ठेकेदारांना अनेकवेळा सांगूनदेखील ठेकेदार लक्ष देत नाही असे लोकांचे म्हणणे आहे.

असोंड विद्यापीठ या परिसरामध्ये प्रत्यक्ष उखडलेला रस्ता दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी टेटवली येथे प्रारंभाचा नारळ फोडला. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार होईल, असे सर्वार्ंना वाटू लागले. मात्र, ठेकेदारांनी अपेक्षांनाच डांबर फासले आहे. त्यामुळे हे काम दर्जाहीन दिसत आहे. काम दर्जाहीन होत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी गावतळे येथील ग्रामस्थांनी काम बंद पाडले. मात्र, याचा ठेकेदारांवर काहीच फरक पडला नाही.