Wed, Sep 26, 2018 16:10होमपेज › Konkan › कोकणात दोन दिवस उष्ण लहरींचे

कोकणात दोन दिवस उष्ण लहरींचे

Published On: Mar 10 2018 11:02PM | Last Updated: Mar 10 2018 10:24PMरत्नागिरी : प्रतिनिधी

उष्ण लहरींमुळे पुढील दोन दिवस कोकणातील तापमान वाढणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. मुंबईसह रायगड व रत्नागिरी या भागात ही तापमानवाढ होईल, असे हवामान खात्याने आपल्या हवाई संदेशात नमूद केले आहे.


भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आणि सोमवारी कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या भागातील तापमान वाढणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तापमानात वाढ होणार असून, पारा 35 ते 38 अंश सेल्सिअसनेे उसळी मारेल. सामान्य तापमानापेक्षा हे प्रमाण 4 ते 7 अंश से.ने जास्त असल्याचे सांगितले जाते. रविवारी  आणि सोमवारी तापमानात वाढ होणार असली, तरी त्यानंतर तापमानात घट होईल. बुधवारी म्हणजे 14  फेब्रुवारीला तापमान सामान्य होईल. तापमानातील वाढीने वार्‍याच्या वेग उष्णतेने भारीत राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

समुद्रसान्‍निध्यामुळे कोकण परिसरातील हवा वेगाने तापत नाही. बाष्पयुक्‍त वारे तापमान नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील कोरड्या हवेच्या तापमानापेक्षा कोकणातील तापमान नेहमीच कमी असते. परंतु, मागील दोन दिवसात मात्र उलट स्थिती आहे. गेल्या आठवड्यात रायगड ते रत्नागिरी या परिसरात अंतर्गत भागापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली होती. उष्ण लहरींमुळे सागराचे पाणीही तापत असल्याने या भागातील तापमानात नियमित तापमानापेक्षा जास्त उकाडा जाणवण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.