Tue, Sep 25, 2018 13:04होमपेज › Konkan › मढाळ येथील तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

मढाळ येथील तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

Published On: Jan 29 2018 11:23PM | Last Updated: Jan 29 2018 11:23PMरत्नागिरी : प्रतिनिधी

खरेदी केलेल्या जमिनीची 7/12 वर नोंद घालण्यासाठी तक्रारदराकडे 7 हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारताना गुहागर तालुक्यातील मढाळ येथील तलाठ्याला रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी 4.30 वा. मढाळ तलाठी कार्यालयात रंगेहाथ पकडले. अशोक सखाराम थोरात (वय 52, रा. सुमन अपार्टमेंट कावीळतळी, चिपळूण) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. 

या प्रकरणातील तक्रारदारांच्या मुलीने झोंबडी येथे खरेदी केलेल्या जमिनीची सातबारावर नोंद घालण्यासाठी तलाठी अशोक थोरात याने त्यांच्याकडे 7 हजार रुपये मागितले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.