Sat, Feb 16, 2019 04:37होमपेज › Konkan › स्वाभिमान पक्षातर्फे लांजात 9 रोजी साखळी उपोषण

स्वाभिमान पक्षातर्फे लांजात 9 रोजी साखळी उपोषण

Published On: Jan 06 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 10:56PM

बुकमार्क करा
लांजा : प्रतिनिधी 

लांजा ग्रामीण रुग्णालयातील गेली अनेक वर्षे असलेल्या दुरवस्थेबाबत लांजा तालुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने  9 जानेवारी रोजी तहसील कार्यालयसमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे 

याबाबत त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिलेल्या निवेदनामध्ये  रुग्णालयाची सध्या असलेली इमारत मोडकळीस आली असून त्याची तातडीने दुरुस्ती करणे, रिक्‍त असलेली वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्‍ती, गेली अनेक वर्षे रिक्‍त असलेली फार्मासिस्टची जागा नियुक्‍ती करणे, क्लेरिकल स्टाफ भरणे, बंद असलेले ऑपरेशन थिएटर सुरु करणे, एक्स -रे मशीन ऑपरेटरची नियुक्‍ती करणे, बंद अवस्थेत असलेले  इसीजी मशीन त्वरित बदलून देणे, ब्लड बँकेची व्यवस्था करणे, भूलतज्ज्ञ उपलब्ध करून देणे, प्रसूतीसाठी स्वतंत्र खाटा नाहीत, आर. एच. साठी बेड नाहीत अशा ससमस्यांसह डॉक्टर क्‍वार्टर बंद अवस्थेत पडल्या असून त्याची तातडीने दुरुस्ती करणे, नर्सिंग क्‍वार्टर्सही बंद अवस्थेचे असून पूर्ण इमारत मोडकळीस आली आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत, सोनोग्राफी मशीन नाही, संपूर्ण रुग्णालयात दुर्गंधी, शवविच्छेदन रूमची दुरवस्था  अशा अनेक मागण्या त्यांनी या निवेदनात केल्या असून यावर तातडीने उपाययोजनेची मागणी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार, पोलिस निरीक्षक लांजा, आ. राजन साळवी यांना दिल्या आहेत. साखळी उपोषण  आठवडा बाजाराच्या दिवशी असून यासाठी  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने हे पहिलेच आंदोलन  आहे.

यासाठी पं. स. समिती सदस्य मुनाफ दसूरकर, संजय यादव, मुन्ना खामकर,  मिलींद लांजेकर,  हेमंत शेट्ये, अशोक गुरव, इलियाज बंदरी, साजिद शेख, शेखर सावंत, विवेक कनावजे, सचिन 
माजळकर, ओंकार आंब्रे, प्रताप पवार आदी कार्यकर्ते मेहनत घेत 
आहेत.