Sun, Sep 23, 2018 03:03होमपेज › Konkan › विद्यार्थ्याची नेरूरपार खाडीपात्रात आत्महत्या 

विद्यार्थ्याची नेरूरपार खाडीपात्रात आत्महत्या 

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 11:43PM

बुकमार्क करा
कुडाळ : वार्ताहर

नेरूरपार-नाकझरवाडी येथील रोहित चंद्रशेखर नाईक (वय 17) या बारावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा मृतदेह नेरूरपार येथील पुलानजीक सापडला. शुक्रवारी  कॉलेजमध्ये जातो, असे सांगून बाहेर पडलेल्या या विद्यार्थ्याने कॉलेज बॅगसह नेरूरपार पुलावरून उडी घेत आत्महत्या  केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. रोहित नाईक हा काळसे येथील विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होता.   शुक्रवारी दुपारनंतरही रोहित घरी न आल्याने घरातील  व्यक्‍तींनी त्याचा शोधाशोध सुरू केला. यानंतर सायंकाळी गावातील युवक, ग्रामस्थ यांनीही त्याचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला.