Sun, Nov 18, 2018 17:44होमपेज › Konkan › ‘आशाताईं’चा एल्गार

‘आशाताईं’चा एल्गार

Published On: Jan 16 2018 2:11AM | Last Updated: Jan 15 2018 9:46PM

बुकमार्क करा
ओरोस : प्रतिनिधी

आपल्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन, शालेय पोषण आहार कामगार संघटनेने सोमवारी एल्गार पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा अर्चना धुरी, सचिव विजयाराणी पाटील, नीलिमा लाड यासह संघटनेचे जिल्हा तालुका पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

ओरोसतिठा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर न्याय्य मागण्यांसाठी दुपारी मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमस्वरूपी सर्वव्यापी करून अभियानावरील निधीत पुरेशी वाढ करावी, आशा, गट प्रर्वतकांना काम करून दरमहा अठरा हजार वेतन, सेवाभत्ते मिळावेत, आरोग्य व्यवस्थेतील खासगीकरण बंद करून या सेवा सुविधेमध्ये आमूलाग्र बदल करावा, अशा विविध मागण्या यावेळी मोर्चेकर्‍यांनी केल्या.