Fri, Mar 22, 2019 05:52
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › गुरुवारी ‘राजापूर बंद’ 

गुरुवारी ‘राजापूर बंद’ 

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:15PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील नाणार परिसरात होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला प्रकल्पग्रस्त विविध मार्गांनी विरोध करत असताना आता प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी प्रकल्पविरोधी शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या वतीने राजापूर  ‘तालुका बंद’ची हाक देण्यात आली आहे. गुरुवार, दि.28 रोजी राजापूर तालुका बंद पुकारण्यात आला असून, याला राजापुरातील विविध संघटनांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

 नाणार व लगतच्या जवळपास 14 गावांमध्ये जगातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त जनतेने जोरदार विरोध दर्शविला आहे. सर्व राजकीय पक्ष, व्यापारी संघटना, रिक्षा चालक-मालक संघटना, विविध सामाजिक संस्था, गुरव समाज संघटना, राजापूर तालुका कुणबी संघटना, चिरेखाण संघटना व अन्य सर्व संघटनांनी सहकार्य करून बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.