Wed, Feb 26, 2020 08:20होमपेज › Konkan › पोलिसांच्या ताब्‍यातून चोरटा पसार

पोलिसांच्या ताब्‍यातून चोरटा पसार

Published On: Dec 19 2017 11:46PM | Last Updated: Dec 19 2017 11:45PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

दापोली येथून लाखो रुपयांची चोरी करुन फरार होताना दापोली, खेड पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेरबंद केलेल्या प्रदिप पुजारी या संशयित आरोपीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातून पळ काढला आहे. त्यामुळे पोलीसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

प्रदिप पुजारी हा कामासाठी दापोली तालुक्यातील पिसाई वझरवाडीतील संजीवनी संदिप रायकर त्यांच्याकडे होता. तो यापुर्वीही त्यांच्याकडे राहिला असल्याने त्याला त्यांच्या घरातील सर्व गोष्टीची माहिती होती. गुरुवार 14 डिसेंबर रोजी घराची सर्व जबाबदारी प्रदिपवर टाकून संजीवनी रायकर दुपारी आधार कार्ड काढण्यासाठी दापोली येथे गेल्या होत्या.  सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. तसेच प्रदिपचा कोठेही पत्ता नव्हता. त्यांनी आरडा-ओरडा केल्यावर आजू-बाजूच्या नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेतल्यावर त्यांना चोरी झाल्याची माहिती रायकर यांनी दिली.  याच कालावधीत गावातील काही महिलांनी प्रदिपला रायकर यांच्या घराकडून जंगलात पळून जाताना पाहिले होते. त्यानंतर संजीवनी रायकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात प्रदिप विरोधात तक्रार दिली होती. 

प्रदिप खेड रेल्वे स्थाकातून मुंबईला पळून जावू शकतो, या शक्यतेने पोलिसांसह स्थानिकांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. त्याठीकाणी आदिच पोहचलेल्या काही नागरिकांनी प्रदीपला मारहाण केली होती. यात तो जखमी झाला होता. प्रदिपला नागरिक मारत असल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी  त्याची चौकशी करुन चोरीतील मुद्देमाल जप्त केला होता. तर जखमी झालेल्या प्रदिपला खेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करणयत आले होते. प्रकृती गंभीर झाल्याने शुक्रवार 15 डिसेंबराला सायंकाळी  5.30 वाजता प्रदिपला 108 रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा शासकीय  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्यासोबत पोलिसांनी तक्रादारांना पाठवले होते. 

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रदिपला दाखल केल्यानंतर तक्रारदार निघुन गेले होते. परंतू, शनिवार 16 डिसेंबर रोजी सकाळी कोणालाही न सांगता प्रदिपने जिल्हा रुग्णालयातून पळ काढला. याबाबत येथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी  प्रदिप पळाल्याची माहिती पोलिसांना कळवली. चोरी प्रकरणात नागरिकांनी पकडून दिलेल्या संशयीत आरोपीकडून पोलिसांनी दागिने जप्त केले. तर त्याच्यावर रुग्णालयात देखरेख का ठेवली नाही?  ही जबाबदारी खेड, दापोली पोलिसांपैकी नक्की कोणाची होती? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.