Thu, Jun 27, 2019 13:47होमपेज › Konkan › सहा अंगणवाडी सेविकांची तिसर्‍या अपत्यामुळे गोची!

सहा अंगणवाडी सेविकांची तिसर्‍या अपत्यामुळे गोची!

Published On: Feb 28 2018 1:15AM | Last Updated: Feb 27 2018 10:38PMराजापूर : प्रतिनिधी

शासनाच्या नियमानुसार  तिसर्‍या अपत्याच्या मुद्द्यावरून राजापूर तालुक्यातील 6 अंगणवाडी सेविकांच्या नोकरीवर कायद्याचा बडगा येऊन नोकरीला मूकण्याची वेळ आली आहे.

राजापूर तालुक्यात जवळपास 253 अंगणवाडी सेविका असून त्यातील चार पदे रिक्‍त आहेत. तालुक्यात 53 मदतनीस असून त्यातही चौदा पदे रिक्‍त आहेत. यापूर्वी दि. 13 ऑगस्ट 2014 नंतर तिसर्‍या अपत्याला जन्म देणार्‍या अंगणवाडी सेविकांवर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार तिसरे अपत्य असलेल्या अंगणवाडी सेविकांचा शोध घेण्याची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये राजापूर तालुक्यात एकूण सहा अंगणवाडी सेविका असल्याचे आढळले. या सहाही अंगणवाडी सेविकांवर तिसरे अपत्यामुळे नोकरी गमावण्याची वेळी आली आहे.

याबाबतची माहिती संबंधित विभागाकडून गोळा करण्यात आली असून ती शासनाकडे सादर केली जाणार आहे. दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये खळबळ उडाली आहे.