Sat, Mar 23, 2019 16:33होमपेज › Konkan › आतापर्यंत ३८७७ उमेदवार पात्र

आतापर्यंत ३८७७ उमेदवार पात्र

Published On: Mar 14 2018 10:29PM | Last Updated: Mar 14 2018 9:56PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग पोलिस दलातील पोलिस शिपायांच्या 71 रिक्त जागांसाठी 12 मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू झाली. 14 मार्च सकाळच्या सत्रापर्यंत बोलविण्यात आलेल्या 6725 उमेदवारांपैकी 4178 उमेदवार भरती प्रक्रियेला उपस्थित राहिले. त्यातील 301 उमेदवार शारीरिक चाचणीत अपात्र ठरले असून 3877 उमेदवार आतापर्यंत झालेल्या विविध चाचण्यांमध्ये पात्र ठरले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील रिक्त असलेल्या 71 जागांसाठी 10,176 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. भरती प्रक्रिया 12 मार्चपासून येथील पोलिस परेड मैदानावर अतिशय कडेकोट बंदोबस्तात आणि पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या नियंत्रणाखाली पारदर्शकपणे सुरू आहे. भरतीच्या पहिल्या दिवशी 12 मार्च रोजी संपूर्ण दिवसभरातील दोन सत्रांत 2225 उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यांपैकी उपस्थित 1216 उमेदवारांपैकी 1134 उमेदवार विविध चाचण्याअंती पात्र ठरले.  

दुसर्‍या दिवशी 13 मार्च रोजी दिवसभरातील दोन्ही सत्रांत बोलविण्यात आलेल्या 3 हजार उमेदवारांपैकी 1952 उमेदवारांनी हजेरी लावली. त्यांपैकी 1840 उमेदवार विविध चाचण्यानंतर पात्र ठरले.
14 मार्च रोजीच्या सकाळच्या सत्रापर्यंत एकूण 6725 उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलविण्यात आले. त्यापैकी 4178 उमेदवार भरतीप्रक्रियेसाठी उपस्थित राहीले. त्यातील 3877 उमेदवार  विविध चाचण्यांवर पात्र ठरले आहेत.