Mon, Mar 18, 2019 19:16होमपेज › Konkan › निसर्गाच्या कुशीतलं प्राचीन नाधवडेचं शंभू महादेव मंदिर(Video) 

निसर्गाच्या कुशीतलं प्राचीन नाधवडेचं शंभू महादेव मंदिर(Video) 

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 8:26PMवैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) :  मारुती कांबळे 

नाधवडे गावचे शंभू महादेवाचे मंदिर हे सुप्रसिद्ध मंदिर आहे. मंदिराच्या दारातून बारमाही वाहाणारी गोठणा नदी, मंदिराजवळच असलेला सुप्रसिद्ध उमाळा, अशा निसर्गरम्य वातावरणात हे प्राचीन शिव मंदिर आहे. याठिकाणी महाशिवराञीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच बरोबर श्रावण सोमवारी दर्शनासाठी भाविकांची याठिकाणी मोठी गर्दी असते.

कोल्हापूर - तळेरे महामार्गावर नाधवडे हे तालुक्यातील एक मोठं गाव आहे. गावात असलेली प्राचीन मंदिरे, निसर्गाची अद्भुत शक्ती असलेला येथील उमाळा यामुळे या गावात बारमाही पाणी असते. नैसर्गिक संपदेने समृध्द असलेल्‍या या गावाला पर्यटकांची चांगली पसंती मिळत आहे. महामार्गापासून अगदी दोनशे मिटर अंतरावर असलेल्या या धार्मिक स्थळांला या मार्गाने येणारा प्रवासी घटकाभर थांबून देवदर्शन घेऊनच पुढे जातो. मंदिराच्या दारासमोरुन वाहणारी गोठणा नदीचा साकव पार करुन भाविक मंदिरात महादेवाचे दर्शन घेतात, तर येथे जवळच असलेले सुप्रसिद्ध उमाळे पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. निसर्ग संपन्न वातावरणात असलेल्या या मंदिरात प्रवेश केला की, भाविकांचे मन अगदी प्रसंन्न होते.

या मंदिरात महाशिवराञीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे श्रावण महिण्यातील सोमवारी भाविक मोठ्‍या संख्येने या मंदिरात हजेरी लावत असतात.