Wed, Jul 17, 2019 20:35होमपेज › Konkan › गळक्या एसटी गाड्या दुरुस्तीसाठी 17 पर्यंत मुदत!

गळक्या एसटी गाड्या दुरुस्तीसाठी 17 पर्यंत मुदत!

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 10:43PMदेवगड : प्रतिनिधी

देवगड आगारातील गळक्या गाड्यांची दुरूस्ती लवकरात लवकर न झाल्यास 17 जुलैला आंदोलन छेडण्याचा इशारा देवगड तालुका मनसेच्यावतीने आगारव्यवस्थापकांना देण्यात आला.

मनसे तालुकाध्यक्ष मयूर मुणगेकर, उपाध्यक्ष अमित घाडी, सचिव जगदीश जाधव, माजी तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, अशोक तेली, अभिजित तेली आदींनी देवगड आगारव्यवस्थापक डी. एम्. चव्हाण यांची भेट घेवून आगारातील गळक्या गाड्यांचा प्रश्‍न मांडला.

देवगड आगारातील गळक्या गाड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या गाड्यांची त्वरित दुरूस्ती करावी, शिवशाही बसेस सुरू करण्याचे आदेश असतानाही देवगड आगारातून अद्याप सुरू करण्यात आली नाही, काही नियमित फेर्‍या वेळेवर सुटत नाहीत, नाटे -बोरिवली व देवगड-सांगली या फेर्‍या कायमस्वरूपी सुरू कराव्यात.

गणेश चतुर्थी हंगामामध्ये देवगड- कुर्ला नेहरूनगर व देवगड -मुंबई सेंट्रल या गाड्या सुरू कराव्यात, आदी मागण्या मनसे शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केल्या. गळक्या गाड्या तत्काळ दुरूस्त करण्यात येतील, असे आश्‍वासन आगारव्यवस्थापक डी.एम्.चव्हाण यांनी दिले.