Thu, Feb 21, 2019 11:34होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : दुचाकी अपघातात युवक ठार

सिंधुदुर्ग : दुचाकी अपघातात युवक ठार

Published On: Jan 28 2018 11:29PM | Last Updated: Jan 28 2018 11:29PMकासार्डे : वार्ताहर

मुंबई गोवा महामार्गावर कासर्डे पोकळे पेट्रोल पंपासमोर झालेल्या दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार झाला. नंदकिशोर जयप्रकाश पालकर (वय २७) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी रात्री ९.२० वा. च्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातात पल्‍सर दुचाकी (क्र. ०७. एई ५६३०) चा चुराडा झाला आहे. 

तळेरेकडून कणकवलीच्या दिशेने जाणार्‍या दुचाकीस्‍वाराला कॉलिस गाडीने जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकी मागून येणार्‍या आयशर टेम्‍पोच्या चाकाखाली सापडून नंदकिशोर जागीच ठार झाला. मृताच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून ओळख पटणे शक्य झाले. 

घटना स्थळापासून पोलिस दूरक्षेत्र  हाकेच्या अंतरावर असून अर्ध्या तासाने पोलिस आल्याने कासार्डे परिसरातील ग्रामस्थांच्या भावनाचा उद्रेक झाला. घटनास्थळी पोलिस पोहचू शकत नसतील आणि नेहमी कुलूप लावून बंद असलेले पोलिस दूरक्षेत्र हवे कशाला?  असा संतप्त सवाल उपस्थित करत तब्बल अर्धा तास महामार्ग रोखून धरला. 

पोलिस आल्यानंतर महामार्ग खूला करण्यात आला तोपर्यंत पेट्रोल पंपापासून महामार्गावर दोन्ही दिशेला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात आंगणेवाडी यात्रेतील मुंबईला परतणा-या चाकरमानी वाहनांमुळे अधिकच भर पडली होती. 

पोलिसांनी त्वरीत नाकाबंदी करून धडक मारून पसार झालेली दोन्ही वाहणे ग्रामस्थांच्या मदतीने  पकडण्यात यश मिळविले आहे.