होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस

सिंधुदुर्गात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस

Published On: Mar 14 2018 10:29PM | Last Updated: Mar 14 2018 10:01PMकणकवली : प्रतिनिधी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्गात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी 5.30 नंतर अचानक वातावरणात बदल होऊन जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. काही ठिकाणी विजांचा कडकडाटही झाला. विशेषतः सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले आंबा, काजू पीक वाया जाण्याची शक्यता असून शेतकरी, बागायतदार हवालदिल झाला आहे. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. 

गेल्या काही दिवसांपासून कोकणात उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाली होती. दुपारचे अक्षरशः उन्हाचे चटके बसत असत. त्यातच बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडा प्रचंड वाढला होता. सायंकाळी आकाशात गरजणारे  मेघ आणि सह्याद्री पट्ट्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा शिडकाव झाला, काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या.