Mon, Sep 24, 2018 15:23होमपेज › Konkan › आरोग्‍य सुविधांच्या मागण्यांसाठी दोडामार्ग वासियांचे आंदोलन

आरोग्‍य सुविधांच्या मागण्यांसाठी दोडामार्ग वासियांचे आंदोलन

Published On: Mar 20 2018 12:10PM | Last Updated: Mar 20 2018 12:10PMसिंधुदुर्ग : प्रतिनिधी

आरोग्‍याच्या विविध सुविधांच्या मागण्यांसाठी दोडामार्ग तालुक्‍यातील नागरिकांनी आंदोलन सुरु केले आहे. आपल्‍या विविध मागण्या घेऊन तालुकावासिय एकत्र आले आहेत. 

दोडामार्ग तालुक्यात ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना तत्काळ सेवा उपलब्ध होत नाहीत. माकडताप व अन्य गंभीर आजारावर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर आणि साधनसामुग्री उपलब्ध नसल्याने तालुक्यातील आरोग्य सेवा रामभरोसे झाली आहे. तालुक्यात ८० टक्‍के लोक गोरगरीब आहेत. सर्वसामान्य रुग्णांना खाजगी हॉस्पिटलचा सेवाखर्च  परवडणारा नाही आहे. यासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा आणि रुग्णालयात चांगले डॉक्टर, कर्मचारी तसेच वैद्यकीय सेवेसाठी लागणारी उपकरणे व महत्वाच्या सुविधा मिळव्यात. गोवा राज्य सरकार बाबुळी, म्हापसा जिल्हा रुग्णालयात दोडामार्ग वासियांकडून रुग्ण शुल्क घेतले जाते ते तत्काळ बंद करून पुर्वीप्रमाणे विना शुल्क सेवा देण्यात यावी. दोडामार्ग व सिंधुदुर्ग वासियांकडून घेतले जाणारे वैद्यकीय सेवा शुल्क महाराष्ट्र सरकारने गोवा सरकारला अदा करावे, माकड तापाच्या रुग्णांना योग्य उपचारासाठी सर्व सुविधा विनाशुल्क मिळाव्यात. बाँदा किंवा दोडामार्ग येथे गोवा बाबुळी प्रमाणे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे. या मागण्यांसाठी आरोग्याचा जनआक्रोश हा विषय गेले दोन महीने एकसारखा वादळाप्रमाणे घोंगावत आहे.  त्‍याच प्रश्नासाठी आज (दि. २०)हजारो तालुकावासीय एकत्रित आले आहे.

 Tags : sindhudurg, dodamarg, taluka people, protest, dodamarg