Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Konkan › आचरा पिरवाडीतील शिमगोत्‍सवाला घुमट वादनाने प्रारंभ (व्‍हिडिओ)

आचरा पिरवाडीतील शिमगोत्‍सवाला घुमट वादनाने प्रारंभ (व्‍हिडिओ)

Published On: Mar 03 2018 8:08PM | Last Updated: Mar 03 2018 8:08PMआचरा : उदय बापर्डेकर

कोकणात शिमगोत्‍सव आणि गणेशोत्‍सव खास पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्‍सहात साजरा केला जातो. या सणामध्ये लोककलांचे विविध अविष्कार येथे पहायला मिळतात. यावेळीही आचरा पिरावाडी येथे गाबित बांधवांचा शिमगोत्सव आगळ्यावेगळ्या पारंपरिक पध्दतीने दरवर्षी साजरा करण्यात येतो आहे. फाल्गुन वैद्य द्वितीय तुकाराम बीज या दिवसी आचरा येथील ऐतिहासिक इनामदार देव रामेश्वर मंदिरात आचरा पिरावाडी येथील गाबित (मच्छिमार )बांधवांनी एकञ येत आपल्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे कोळी नृत्य करून वार्षिक शिमगा उत्सवास शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर देव रवळनाथ मंदिर येथे घुमट वाध्यावर आपले नृत्य सादर करण्यात आले.

तुकाराम बीजपासून चालू झालेल्या या पाच दिवस चालणाऱ्या शिमगोत्सवामध्ये दररोज राञी आचरा पिरावाडी येथील दक्षिणवाडा, कुबलवाडा, मधलावाडा, कृष्णनगर, आदीवाड्या मार्फत विविध सांस्कृतिक, कार्यक्रम, नाटके, कोळी नृत्य सादर केले जातात. आचरा गावचा नाटकांचा असलेला वारसा जोपासण्याची कामगिरी गेली अनेक वर्षे आचरा पिरावाडीमधील गाबित (मच्छिमार ) बांधव करीत आहेत. आचरा परिसरातून हा उत्‍सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्‍थित असतात.