Wed, Nov 14, 2018 02:42होमपेज › Konkan › दहावीची परीक्षा आजपासून

दहावीची परीक्षा आजपासून

Published On: Mar 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 28 2018 10:54PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी.) गुरुवार 1 मार्च 2018 रोजी पासून सुरू होत असून 41 केंद्रांवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 हजार 286 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

इयत्ता 10 वीची परीक्षा गुरुवार 1 ते 24 मार्च या कालावधीत होत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 41 केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या 41 परीक्षा केंद्रांवरून जिल्ह्यातील 12 हजार 286 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यात 5497 मुले व 5789 मुलींचा समावेश आहे. ही परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. कॉपीसारखा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हास्तरावर 5 भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, निरंतर यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकी एक, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी व माध्यमिक विस्तार अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकी एक भरारी पथकांचा समावेश आहे. भरारी पथकात व्हिडीओ कॅमेर्‍याचा समावेश असणार आहे.