Sat, Dec 07, 2019 14:04होमपेज › Konkan › पिंगुळीत स्वाभिमान-मनसेचा झेंडा

पिंगुळीत स्वाभिमान-मनसेचा झेंडा

Published On: Apr 08 2018 2:12AM | Last Updated: Apr 08 2018 2:05AMकुडाळ : प्रतिनिधी

पिंगुळी पं.स. मतदारसंघाच्या  पोटनिवडणुकीत  महाराष्ट्र स्वाभिमान  पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सौ. नीलिमा  नीलमकुमार  वालावलकर यांचा विजय झाला. विजयानंतर स्वाभिमान व मनसेने जल्लोष केला. स्वाभिमान-मनसेच्या आघाडीमुळे शिवसेनेने आपली एक जागा गमावल्याने शिवसेनेला हा  मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेच्या पं.स.सदस्या सौ. संपदा पेडणेकर यांचे अकाली निधन झाल्याने पिंगुळी पं.स.मध्ये पोटनिवडणूक  झाली. या निवडणुकीत शिवसेना, स्वाभिमान-मनसे आघाडी, भाजप व  काँग्रेस-राष्ट्रवादीने  आपले उमेदवार रिंगणात उतरविले  होते. अपेक्षेप्रमाणे शिवसेना व स्वाभिमान-मनसेच्या आघाडीत कडवी लढत झाली. या लढतीत स्वाभिमान-मनसेच्या नीलिमा  वालावलकर (1309) शिवसेनेच्या सौ. शमिका कुडाळकर (1142), भाजपच्या  सौ. दर्शना वाळके (501) व काँग्रेसच्या सौ. नेहा पिंगुळकर  (122) तर नोटा 41 अशी मते मिळाली.

कुडाळ तहसील कार्यालयात तहसीलदार अजय घोळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी 10.30 वा.मतमोजणी सुरू झाली.पहिल्या राऊंडपासून स्वाभिमान-मनसेच्या उमेदवार सौ.वालावलकर यांनी आघाडी घेतली होती.

विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष?
सलमानला विदेशात जाण्यासही न्यायालयाने बंदी घातली आहे. दरम्यान, बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सलमानला पाठिंबा व्यक्त केला. सलमानला जामीन मंजूर होताच चाहत्यांनी जल्लोष व्यक्त केला.

काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खान याला दोषी ठरवत पाच वर्षांच्या तुुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणातील अन्य सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम आदींना संशयाचा फायदा देत न्यायालयाने निर्दोष ठरविले होते. यानंतर सलमानची रवानगी थेट मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

शुक्रवारी सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. बचाव पक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सुनावणी एक दिवस पुढे टाकली होती. शनिवारी पुन्हा याप्रकरणी सुनावणी झाली. 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सलमानच्या वकिलांनी ही माहिती दिली. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. दरम्यान, सलमानच्या जामिनाला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला होता. मात्र, न्यायाधीशांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करून सलमानला जामीन मंजूर केला.

सलमानची सुटका होणार हे स्पष्ट होताच, जोधपूर न्यायालय परिसर आणि मुंबईतील त्याच्या घराबाहेर एकच जल्लोष सुरू झाला. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले चाहते सलमानच्या घराबाहेर जमले आहेत. अलवीरा आणि अर्पिता या सलमानच्या दोन बहिणी आणि अंगरक्षक शेरा न्यायालयात उपस्थित होते. 1998 साली ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानला गेले होते. त्यावेळी सलमानने दोन काळविटांची शिकार केली होती. यावेळी सलमानसोबत अन्य कलाकारही होते; पण न्यायालयाने सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांची निर्दोष सुटका केली व एकट्या सलमानला दोषी ठरवले.

Tags : shwabhiman party,  mns,  kudhal by election