Tue, Jul 16, 2019 00:25होमपेज › Konkan › नायजेरियन कृषी प्रतिनिधींची ‘बांदिवडे काळी मिरी’प्रकल्पास भेट

नायजेरियन कृषी प्रतिनिधींची ‘बांदिवडे काळी मिरी’प्रकल्पास भेट

Published On: Mar 13 2018 11:21PM | Last Updated: Mar 13 2018 9:20PMश्रावण : वार्ताहर

निसर्ग संपन्‍न सिंधुदुर्गात नैसर्गिक रित्या होणारी फळपिके म्हणजे  शेतकर्‍यांना मिळालेले वरदान आहे. काळी मिरी, काजू, नारळ, कोकम व अन्य  उत्पादनांचा व त्यांवर आधारित प्रक्रिय उद्योगांचा अभ्यास करून त्यांची अमंलबजावणी नायजेरीयामध्ये  करण्याचा मानस आहे. जेणेकरुन भ्रष्टाचारग्रस्त नायजेरीयाला  आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, त्याच बरोबर बेरोजगार तरुणांना व्यावसाय उपलब्ध होतील, अशी प्रतिक्रीया नायजेरिया येथून अभ्यास दौर्‍यासाठी आलेले ‘आयेडा’ संस्थेचे चेअरमन मुसा बावा यांनी व्यक्‍त केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी नायजेरीयातील एक प्रतिनिधी मंडळ सिंधुदुर्गात आले आहे.नायजेरीयात उत्पादित काजू प्रक्रिया न करताच निर्यात होतो. सिंधुदुर्गात या प्रक्रियेचे ठिकठिकाणी युनिट आहेत. या द्वारे काजूपासून गर, टरफलपासून तेल, बोंडू पासून सिरप असे  पदार्थ मिळवितात.  नाविण्यपूर्ण मिरी लागवड आदी कृषी प्रकल्पांचा अभ्यास करून नायजेरीयन तरूणांना सिंधुदुर्गातील उद्योजकांमार्फत प्रशिक्षित करण्यासाठी या प्राथमिक अभ्यास दौर्‍याचे आयोजन केले असल्याचे आयेडाचे समन्वयक ओके बेकुरेव यांनी सांगितले. 

या पथकाने  बांदिवडे  येथील नाविण्यपूर्ण काळी मिरी प्रकल्पाला भेट दिली. यासाठी मिरी शेतीचे प्रणेते मिलिंद प्रभू  व शेती, नारळ तज्ज्ञ विनय सामंत यांनी पुढाकार घेतला.  काळी मिरी व काजू  या प्रमुख दोन पिकांच्या आर्थिक सुबत्तेची जागतिक प्रसिध्दी व्हावी, या दृष्टीने मिलिंद प्रभू व विनय सामंत यांनी पुढाकार घेऊन नायजेरीयन मंडळाशी चर्चा केली. नायजेरीयात तरूण व शेतकरी वर्गासाठी काम करणार्‍या ‘ आयेडा’ संस्थेचे या मंडळात नायजेरीयातील जीबॅको शहराचे महापौर जॉन तमन, अगवाराचे महापौर जाफरा मोहम्मद, आयेडाचे चेअरमन मुसा बावा, समन्वयक ओके बेकुरेव अशा चौघांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने बांदिवडे येथील मिलिंद प्रभू यांच्या काळी मिरी प्रकल्प, काजू, नारळ बागा व त्यामधील मसाल्याची आंतरपिके व नर्सरी  यांची पाहणी केली. तसेच सेवानिवृत्त अभियंता अरूण भट यांच्या नारळ, सुपारी व मसाले पिक बागायतींची पहाणी करून माहिती घेतली.  या सर्वेक्षणांनंतर नायजेरीया काजू क्षेत्रात मिरी लागवडीत मोठी क्रांती घडून येईल अशी आशा व्यक्‍त केली. 
सिंधुदुर्गातील काजू प्रक्रिया कारखानदारांना व प्रशिक्षकांना संधीसिंधुदुर्ग जिल्हा काजू उत्पादन व प्रोसेसिंग प्रक्रियेमध्ये अग्रेसर असून इथे मोठ्या प्रमाणात काजू प्रक्रिया कारखाने आहेत. काजू, बोंडू व टरफले यांवर प्रक्रिया करून विविध उत्पादने घेतात. त्यामुळे व्यवसायात भरपूर संधी उपलब्ध  आहेत. त्यामुळे साहजिकच आर्थिक उत्पन्‍न चांगले मिळते. आजवर कोकण किंवा सिंधुदुर्ग हा केवळ समुद्रकिनारे निसर्गसौंदर्य, देवस्थाने अशा गोष्टींमुळे प्रसिध्द होता. परंतू सिंधुदुर्गाच्या सोशल मिडियावरील प्रसिध्दीमुळे कोकणात परदेशी  तज्ज्ञ अभ्यासदौरे करून कोकणी माणसांचे मार्गदर्शन घेण्यासाठी नायजेरीयात नेणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच आपण ज्ञान संकल्पना पध्दत व तंंत्रज्ञानाचा विनियोग विदेशी लोकांना करणार असल्याचा अभिमान आहे. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाल्यावर नायजेेरीयात उत्पादित काजू  आपल्याकडे आयात होईल आणि येथील प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी घडविण्यासाठी नायजेरीयात जातील किंवा सुपरवायझर म्हणून जातील. इथल्या लोकांना नायजेरीयन लोकांबरोबर लघुउद्योग विषयी माहितीची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कोकम सारख्या पदार्थांना नायजेरीयातील बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच अन्य  कोकणी पदार्थांना नायजेरीयात योग्यभाव व बाजारपेठ मिळवून देणार असे या शिष्टमंडळाने सांगितले. 

काळी मिरी प्रकल्पाचे व्यवस्थापक संतोष घाडीगावकर, सहाय्यक बाबू कडू, शैलेश राणे, नारळ तज्ज्ञ विनय सामंत, अरूण भट, डॉ. सुहास आचरेकर, पत्रकार गणेश चव्हाण, झुंजार पेडणेकर, दत्तप्रसाद पेडणेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.