Tue, Jul 16, 2019 01:35होमपेज › Konkan › जी. एस. परब यांना ‘आदर्श परब’ पुरस्कार

जी. एस. परब यांना ‘आदर्श परब’ पुरस्कार

Published On: Nov 30 2017 11:32PM | Last Updated: Nov 30 2017 9:03PM

बुकमार्क करा

श्रावण :वार्ताहर 

परब मराठा समाजाचे नेते जी.एस. परब यांनी समाज बांधवांना संघटित करण्यासाठी हाती घेतलेल्या कार्याची दखल घेवून परब समाज मंडळाने त्यांना या वर्षीचा ‘आदर्श परब’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

 परब मराठा समाज मुंबईचे आंतरराज्य अधिवेशन 19 नोव्हेंबर रोजी श्री  शांतादुर्गा देवस्थान सभागृह,धारगळ-गोवा येथे झाले. यावेळी  अधिवेशनाचे अध्यक्ष जयवंत परब, गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर (बाबू)आजगांवकर, माजी शिक्षणमंत्री सौ. संगिता परब, ऑल इंडिया आर्थोपेडीक असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. राम प्रभू, क्रॉस लिंक आंतरराष्ट्रीय लीडर डॉ.नितीन परब, मुंबई महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, मुंबई आ. अ‍ॅड. डॉ. अनिल परब, नगरसेवक सदानंद परब, सदा परब, निर्माण समुहाचे अध्यक्ष व मराठा बिझनेस फोरमचे उपाध्यक्ष राजेंद्र सावंत, पुणे जिल्हा संघटक सुदाम परब,गुजरात राज्य संघटक डॉ. राजेश परब. बेळगाव संघटक पंढरी परब, उद्योजक व समाजाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण  परब, कार्याध्यक्ष प्रकाश परब, गोवा राज्य संघटक पांडुरंग (भाऊ) परब, आत्माराम परब, सिंधुदुर्ग संघटक विनायक परब यांच्या उपस्थितीत जी. एस. परब यांना हा पुरस्कार देण्यात आला.  सौ. रश्मी वारंग-धुरी यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. आभार पांडुरंग परब यांनी  मानले.