Fri, Nov 16, 2018 20:14होमपेज › Konkan › नानार : विधान भवन परिसरात शिवसेनेचे आंदोलन 

नानार : विधान भवन परिसरात शिवसेनेचे आंदोलन 

Published On: Jul 06 2018 7:46PM | Last Updated: Jul 06 2018 7:46PMनागपूर : पुढारी ऑनलाईन 

नानार रिफायनरी प्रकल्प हद्दपार करण्याचा पवित्रा घेत विधान भवनच्या पायऱ्यांवर शिवसेना आमदारांनी आंदोलन करून  निदर्शने नोंदविली. नाणार  प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशा घोषणांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला. यावेळी आमदार वैभव नाईक सुनील प्रभू, राजन साळवी, सदानंद चव्हाण, प्रताप सरनाईक, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश फातर्फेकर, दयानराज  चौगुले,  अजय चौधरी, तुकाराम काते, व शिवसेना नेते उपस्थित होते.  

नाणार  रिफायनरी प्रकल्प हा हद्दपार झालाच पाहिजे, अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. या प्रकल्पाचा सर्वच गोष्टींवर परिणाम होणार आहे. कोकणच्या नैसर्गिक सौदर्याला बाधा पोहचणार असून पर्यावरण समतोल ढासळणार आहे.यातून कोकणचे वैभव नष्ट होणार आहे.कोकणचे उत्पन्न साधन असलेल्या काजू, आंबा बागायती नष्ट होणार आहेत. अशी भूमिका यावेळी शिवसेना आमदारांनी मांडली.