Sat, Dec 07, 2019 13:58होमपेज › Konkan › दापोलीत सेना-काँग्रेसची युती यशस्वी

दापोलीत सेना-काँग्रेसची युती यशस्वी

Published On: Dec 06 2018 1:35AM | Last Updated: Dec 05 2018 9:50PMदापोली : प्रतिनिधी

दापोली नगरपंचायतीमध्ये सेना-काँग्रेस अशी युती यशस्वी झाली असून या युतीच्या  माध्यमातून  दापोलीचा  चेहरामोहरा बदलून टाकू ,असे युवा राज्य कार्यकारिणी  सदस्य  योगश  कदम यांनी सांगितले. दापोली येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या सुशोभीकरण उद्घाटनप्रसंगी ते बोलतहोते.

यावेळी  माजी आमदार भाई जगताप, आ.  हुस्नबानू खलिफे, दापोलीच्या नगराध्यक्षा उल्का जाधव, उपनगराध्यक्षा रजिया रखांगे, नगरसेविका परविन शेख यांची उपस्थिती होती. या सुशोभिकरणासाठी दापोली नगरपंचायतीच्या निधितून खर्च करण्यात आला आहे. यावेळी योगेश कदम यांनी सांगितले की, दापोलीमध्ये सेना-काँग्रेसची नगरपंचायतीमध्ये असलेली युती ही अनेकांना पोटदुखी ठरत आहे. दापोली शहरासाठी 2 कोटी 5 लाखांचा निधी आणण्यात आला. त्यामुळे आगामी काळात दापोली शहरातील सर्व रस्ते हे चकाचक दिसणार आहेत.   तालुक्यासाठी आणि दापोली शहरासाठी पालकमंत्र्यांच्या  माध्यमातून कोट्यवधीचा निधी आला आहे. त्यामुळे दापोली शहराचा आणि तालुक्याचा विकास लवकरच होईल, असे ते म्हणाले. दापोली नगरपंचायतीमध्ये भाई जगताप यांनी कायम मला वडिलांसारखीच साथ द्यावी, असे भावनिक आवाहनही कदम यांनी केले. यावेळी शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.