होमपेज › Konkan › नाणार प्रकल्पाविरोधात सेनेने फुंकले रणशिंग

नाणार प्रकल्पाविरोधात सेनेने फुंकले रणशिंग

Published On: May 04 2018 10:35PM | Last Updated: May 04 2018 10:16PMराजापूर : प्रतिनिधी

नाणार प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेच्या मुंबईवासीय पदाधिकार्‍यांनी  जोरदार  रणशिंग फुंकले असून  मंगळवार दि. 8 मे ला शिवसेना भवनमध्ये सायंकाळी 7 वाजता पक्ष पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत व जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम,आमदार राजन साळवी व तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे उपस्थित रहाणार आहेत.

या बैठकीला तालुक्यातील नाणार परिसरात शासनाने लादलेल्या रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. शिवसेनेने सुरुवातीपासूनच नाणार प्रकल्पाविरोधात रान उठवले आहे.आता शिवसेनेचे मुंबईस्थित पदाधिकार्‍यांनी रिफायनरी विरोधात आघाडी उघडली आहे. शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश उर्फ बबन नकाशे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत अनेक भागात रिफायनरी विरोधात स्टीकर लावून जनजागृती करण्यात आली. हा प्रकल्प कसा विनाशकारी आहे ते सर्वांना पटवून दिले जात आहे. नाणारचा संघर्ष सेनेने अधिक तीव्र केला आहे. मंगळवार दि. 8 मे  रोजी दादर (मुंबई) शिवसेनाभवन मध्ये तालुकासंपर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाशे यांनी खास बैठक आयोजित केली आहे. त्यावेळी सेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम स्वत: चंद्रप्रकाश नकाशे मार्गदर्शन करणार आहेत.