होमपेज › Konkan › भडगाव बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजप युतीचा झेंडा  

भडगाव बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजप युतीचा झेंडा  

Published On: Feb 26 2018 3:02PM | Last Updated: Feb 26 2018 3:02PMकुडाळ : प्रतिनिधी

तालुक्यातील भडगाव बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या प्रणिता गुरव विजयी झाल्‍या आहेत. गुरव यांच्यासह आमदार वैभव नाईक यांचे विश्वासू शिलेदार स्विय सहाय्यक तुळशीदास(बाबी) गुरव, प्रिया गुरव, प्रमिला सावंत व समिता भडगांवकर असे चार सदस्य विजयी झाले. तर, स्वाभिमानचे स्नेहल नाईक, प्रणिता लोट व लक्ष्मण लोट असे तीन सदस्य विजयी झाले. 

शिवसेना शाखेत शिवसेनेच्या वतीने युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे स्‍वागत करण्यात आले. शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, जि. प.सदस्य संजय पडते, महिला आघाडी जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला आघाडी तालुका प्रमुख शिल्पा घुर्ये, पं.स. सदस्या शितल कल्याणकर, शरयु घाडी, शाखाप्रमुख राजेंद्र सावंत, डॉ. प्रविण सावंत, रवि सावंत, गुणाजी लोट, भाई लोट, हितेश सावंत, सुहास गुरव, अमित गुरव, भरत गुरव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.