Wed, Jul 17, 2019 00:15होमपेज › Konkan › विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविणार

विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविणार

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 8:28PMसावंतवाडी : प्रतिनिधी

शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असून आगामी निवडणुकीत विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याबरोबर लोकसभेवरही शिवसेनेचेच खासदार असतील यादृष्टीने पक्षांतर्गत बांधणी करण्यास सावंतवाडीतून प्रारंभ करण्यात आला आहे. आगामी 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने पक्ष बांधणीच्या कामाला प्रारंभ केला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या उपस्थितीत सावंतवाडी शहर शिवसेनेची बैठक झाली.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दोडामार्ग, वेंगुर्ले आणि सावंतवाडी या तिन्ही तालुक्यामध्ये पक्षांतर्गत बैठकांचे आयोजन केले जात असून बुधवारी सावंतवाडी शहर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट संपर्क कार्यालयात झाली.तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, शहर प्रमुख शब्बिर मणियार, ज्येष्ठ नगरसेविका आनारोजीन लोबो,तालुका महिला संघटक रश्मी माळवदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश परब, नगरसेविका भारती मोरे, न.प. सभापती माधुरी वाडकर, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी सुकी, कमला मेनन, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, प्रशांत कोठावळे, माजी पं.स. सदस्य अशोक दळवी, जि.प.सदस्य राजन मुळीक, सभापती सुरेंद्र बांदेकर, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बिद्रे, माजी नगरसेवक विलास जाधव, महिला शहर उपसंघटक श्रृतिका दळवी, शिवानी पाटकर, सौ. मुद्राळे, शाखा प्रमुख अर्षद बेग आदी उपस्थित होते. 

नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना पक्षाच्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केले जावे, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला. तसेच त्यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांच्यासह महिला  तालुका संघटक  रश्मी माळवदे यांनाही सर्वांसमवेत बॅनरवर स्थान दिले जावे,अशी मागणी ज्येष्ठ नगरसेविका लोबो यांनी यावेळी केली. यावेळी पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून होत असलेली विकासकामे काँग्रेसच्या ठेकेदारांकडून केली जातात.

शिवसेनेचे नोंदणीकृत ठेकेदार  असताना त्यांना का डावलले जाते.असा सवाल  शिवसेना पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला. विशेषतः महिलावर्गाने आमच्या नोंदणीकृत संस्थांना अशाप्रकारचे ठेके दिले जावेत, अशी मागणी केली. ही बाब वरिष्ठांच्या कानावर घालण्याचे आश्‍वासन संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी दिले.शिवसेनेचे  आमदार, खासदार व मंत्र्यांकडून होत असलेल्या विकासकामांचे त्या त्या भागात फलक लावले जात नाहीत. ही कामे शिवसेनेच्या माध्यमातून होत असताना  त्याचे श्रेय अन्य पक्षांकडून लाटले जात आहे. त्यामुळे होत असलेल्या विकासकामांचे फलक लावले जावेत, अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली. 

Tags : Konkan, shiv sena, win, Legislative Assembly, elections