Wed, Jul 08, 2020 03:11होमपेज › Konkan › थेट नाणार गावात सभा घेऊन शिवसेना भूमिका जाहीर करणार

थेट नाणारमध्ये शिवसेना भूमिका जाहीर करणार

Last Updated: Feb 25 2020 1:24AM
रत्नागिरी : पुढारी ऑनलाईन

कोकणात अत्यंत संवेदनशील ठरलेल्या नाणार प्रकल्पावरून शिवसेना कोणती भूमिका घेणार यावरून चर्चा चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवसेनेचा सुरुवातीपासूनच नाणार प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे येत्या एक मार्चला नाणारमध्ये सभा घेऊन शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. 

नाणार प्रकरणावरून भाजपकडून शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोप होत असल्याने शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. या सभेला पक्षाचे खासदार आणि इतर नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील नाणार प्रकल्पाला पाठिंब्याची भूमिका घेतली आहे. नाणार रिफायनरी समर्थनार्थ शिवसेनेचे स्थानिक नेते एकवटले आहेत. नाणार रिफायनरीला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिले आहे. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकरणी शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.