Wed, Apr 24, 2019 11:59होमपेज › Konkan › दोडामार्गात शिवसेनेचा भाजपला धक्का

दोडामार्गात शिवसेनेचा भाजपला धक्का

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 10:25PM

बुकमार्क करा

दोडामार्ग : प्रतिनिधी

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या माटणे पं. स. गण पोटनिवडणुकीत शिवसेनेने सुरुंग लावला आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी 685 मतांचे मताधिक्क्य घेऊन विजय संपादन केला. तर  भाजपचे उमेदवार असलेले रूपेश गवस यांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त 80, तर नोटाला 95 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवारास 30 मतदान झाले. 

बुधवारी माटणे पं.स.मध्ये पोटनिवडणूक झाली होती. गुरुवारी येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होती. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा; पण शिवसेनेच्या तालुका, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिकांनी पद्धतशीर नियोजन करून शिवसेनेचे तालुकाप्रमुख असलेले उमेदवार बाबुराव धुरी यांच्या पदरी विजयाची माळ घातली.