Thu, Jul 18, 2019 06:16होमपेज › Konkan › मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला

मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला

Published On: Mar 13 2018 11:21PM | Last Updated: Mar 13 2018 10:37PMशिरोडा : वार्ताहर

 मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात चार विद्यार्थ्यांसह सहाजण गंभीर जखमी झाले. मंगळवारी दुपारी 2.30 वा. च्या सुमारास शिरोडा इंग्लिश मीडियमचे हे विद्यार्थी जादा क्‍लास आटोपून घरी जात होते. पर्यायी मार्गाजवळ ते आले असता अचानक मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. 

यात विशाल अरुण पेडणेकर (वय 9), वैभव अरुण पेडणेकर (8), कार्तिकी प्रभाकर किनळेकर (6), ओम प्रभाकर किनळेकर (9) या चिद्यार्थ्यांसह  पूजा प्रभाकर किनळेकर (27), शुभदा रामचंद्र मेस्त्री (30) हे  पालक, पादचारी असे सहजण गंभीर जखमी झाले.  स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात शिरोडा दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मधमाश्यांनी जोरदार डंख मारल्याने सर्वांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात सूज आली आहे. सर्वांची प्रकृती सुधारत असून उपचार सुरू असल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.