Tue, Nov 13, 2018 23:30होमपेज › Konkan › नाणारचा प्रकल्प शिवसेना होऊ देणार नाही

नाणारचा प्रकल्प शिवसेना होऊ देणार नाही

Published On: Apr 23 2018 12:59PM | Last Updated: Apr 23 2018 1:43PMरत्नागिरी: पुढारी ऑनलाईन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज(सोमवार दि.२३) सेनेची नाणार रिफायनरीविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली. "नाणार देणार नाही", असे म्हणत नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी येथे बोलताना व्यक्त केला.

कोकणाला कोणी उद्ध्वस्त केलं, तर तुम्हाला आम्ही उद्ध्वस्त करु. नाणारचा प्रकल्प शिवसेना होऊ देणार नाही, त्यासाठी नाणारवासियांची एकजूट कायम ठेवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कोकणचं गुजरात होऊ देणार नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या पवित्र भूमित नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. कोकणातला हा प्रकल्प विदर्भात घेऊन जावा. कोकणचे गुजरात होऊ देणार नाही. भूसंपादन होणार नाही म्हणजे प्रकल्पच होणार नाही.”प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच गुजराती, मारवाडी परप्रांतियांनी इथे जमिनी कशा खरेदी केल्या? असा सवाल त्यांनी केला.

काय म्‍हणाले उद्धव ठाकरे?

कोकणात रिफायनरी आणणारे अच्छेदिनाचे स्वप्न दाखवणारे व्हिलन

नाणार रिफायनरी प्रकल्प म्हणजे भुमाफियांचा घोटाळा 

नाणार प्रकल्पाच्या बाबातीत पैशाची मस्ती करू नका

नाणार प्रकल्प गुजराथला घेवून जा, कोंबडे झुंजवण्याचे प्रकार थांबवा

माझ्या कोकणाचं गुजराथ होवू देणार नाही

माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीत कवडीची किंमत नाही

नाणार प्रकल्प गुजराथला किंवा नागपूरला न्या 

कोकणाला लाभलेला निसर्ग हा गुन्हा का?

कोकणात येणारे सर्व प्रकल्प गुजराथला न्या

जे या प्रकल्पाच्या तळी उचलत आहेत त्यांनी नाणारमध्ये कोपऱ्यातील सभा घेवून दाखवा


कोकणाची राख करून गुजराथमध्ये रांगोळी घालायची असेल तर, आम्ही ते होवू देणार नाही

आता मोजणी होणार नाही, सरकराने जनतेच्या भावनाचा विचार केला नाही तर, आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देवू, मोजणी करणाऱ्यांना शिवसेना अडवणार.

यापुढे एक इंच जमिन कुणाला विकणार नाही शिवसेना पक्ष प्रमुखांनी दिली शपथ

आज शांततेच्या मार्गांनी चाललोत, पण कायदेशीर मार्गांनी कळत नसेल तर, आम्हाला बे कायदेशीर मार्ग अवलंबा लागेल