Fri, Dec 13, 2019 01:30होमपेज › Konkan › ‘नाणार’विरोधी सेनेचा आज एल्गार

‘नाणार’विरोधी सेनेचा आज एल्गार

Published On: Apr 22 2018 11:21PM | Last Updated: Apr 22 2018 11:10PMराजापूर : प्रतिनिधी

शिवसनेने नाणार रिफायनरीविरोधातील भूमिका स्पष्ट केली असून, स्थानिकांना पाठबळ देण्यासाठी सोमवारी 23 रोजी सागवे येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत नाणार प्रकल्पविरोधातील रणनीती ठरणार आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली आहे.

नाणारसह 14 गावांमधील रिफायनरी प्रकल्पावरून सध्या जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र स्वाभिमान, मनसे, शिवसेना आदी पक्ष प्रकल्पाच्या विरोधात उतरले आहेत. 

रिफायनरी प्रकल्पाच्या औद्योगिकीकरणासाठी अध्यादेश काढला म्हणून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेवर हल्ले चढवले जात 
आहेत. 

या संपूर्ण प्रकल्पावरून शिवसेनेला कोंडीत पकडायचे व त्यांच्यावर चौफेर हल्ले चढवायचे, असे प्रयत्न सध्या शिवसेनेच्या विरोधकांकडून सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दि. 23 एप्रिलला नाणार दौर्‍यावर येत आहेत. त्यावेळी ते शिवसेनेवर होत असलेल्या या टीकेचा कसा समाचार घेतात.