Thu, Feb 21, 2019 15:51होमपेज › Konkan › रत्‍नागिरीला अजस्र लाटांचा तडाखा(Video)

रत्‍नागिरीला अजस्र लाटांचा तडाखा(Video)

Published On: Jul 15 2018 9:09PM | Last Updated: Jul 15 2018 9:09PMगुहागर  - लक्ष्मीकांत घोणसे पाटील   

रत्‍नागिरीतील गुहागर किनारपट्टीला आज, रविवारी पुन्‍हा एकदा अजस्र लाटांचा तडाखा बसला. गेल्या चार दिवसांपासून उधाणाच्या भरतीमुळे रत्‍नागिरीसह सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्‍ह्यातील किनारपट्टीची धूप होत आहे. त्यामुळे समुद्र मानवी वस्‍तीत घुसत असल्याचे चित्र आहे. 

पडलेली माडाची झाडे, वाहून गेलेले किनारे, बंधार्‍यांवर होणारा समुद्राचा मारा आणि त्यामुळे वाहून गेलेले बंधारे असे चित्र गुहागरच्या किनारपट्टीवर आहे. रत्‍नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्ग आणि रायगड किनार्‍यांचीही स्‍थिती आहे. रत्‍नागिरीतील मांडवी मिर्‍या, तर गुहागरमधील वेळणेश्वर आदी ठिकाणी समुद्र रौद्र रूप दाखवतोय. यामुळे किनारे मानवी वसतीकडे सरकू लागले आहेत. तसेच समुद्राच्या भरतीवेळी अजस्‍त्र लाटांचे तांडव किनारपट्टीवर दिसत आहे. 

सतत येणार्‍या लाटांच्या धडाक्याने किनारपट्टीवर नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच मिर्‍या बंधार्‍याचे शनिवारी पडलेले भगदाड आणखी वाढले असून नारळाची झाडेही जमीनदोस्‍त झाली आहेत. त्यामुळे किनारपट्टीवरील नागिरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.