होमपेज › Konkan › आचरा परिसराला आजही उधाणाचा तडाखा

आचरा परिसराला आजही उधाणाचा तडाखा

Published On: Dec 05 2017 1:07AM | Last Updated: Dec 05 2017 1:07AM

बुकमार्क करा

आचराः उदय बापर्डेकर 

ओखी वादळामुळे आचरा जामडूल भेटावर आजही उधाणाचा तडाखा बसला आहे. आचरा पिरावाडी- जामडुल येथील पुलावर पाणी आल्याने ग्रामस्थ, मच्छिमार रस्त्यावर आले आहेत. बंदर जेटी येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

आचरा जामडूल बेटाला पाण्याचा विळखा पडला आहे. आचरा, पिरावाडी आणि गाऊडवाडीचा संपर्क तुटला आहे. पिरावाडी येथील बऱ्याच नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. या परिसरातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिक जीव मुठीत घेऊन या संकटाचा सामना करत आहेत. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे पाणी लोकवस्तीत शिरल्याचे बोलले जात आहे.