Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › सावर्डेतील नारी महोत्सवाची दिमाखात सांगता

सावर्डेतील नारी महोत्सवाची दिमाखात सांगता

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:05PMसावर्डे : वार्ताहर

सावर्डे येथील सह्याद्री क्रीडा संकुलावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभाग व  सह्याद्री शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित नारी महोत्सवाची सांगता सोमवारी झाली. महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा निकम, दिग्दर्शक संदीप सावंत, श्रीमती दळवी, सुहासिनी निकम, आकांक्षा पवार, प्राची शिंदे, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, खेर्डी सरपंच जयश्री खताते यांची उपस्थिती होती. यावर्षी पहिल्यादांच राबिवण्यात आलेल्या  ‘मिसेस सावर्डा’ कार्यक्रमाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. 
सामाजिक कार्यकर्त्या युगंधरा राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस पार पडलेल्या या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धेत विनया केळकर -प्रथम, रत्नमाला कांबळे - शीतल गावडे  विभागून द्वितीय, मंजिरी शेंबेकर, पाककला (तिखट) स्पर्धेत नीता कोकाटे, रमा पाध्ये, मंजिरी शेंबेकर व गोड प्रकारात प्रिया निकम, कांचन पंडित, मानसी सावर्डेकर, रांगोळी स्पर्धेत प्राजक्ता सुर्वे, भाग्यश्री खरात, रसिका नेहतराव, मानसी कांबळे विभागून अनुक्रमे उत्तेजनार्थ, रमा पाध्ये, तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत वैशाली पाटील-प्रथम, डॉ. वर्षा खानविलकर-द्वितीय, प्रिया विचारे-तृतीय,  शिल्पा कोकाटे- उत्तेजनार्थ या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दरम्यान सभापती पूजा निकम, ईशा पवार यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. मीरा जोशी व ऋतुजा कोकाटे यांनी सूत्रसंचलन केले. 

नारी महोत्सवामध्ये सावर्डे बाजारपेठ येथील महिला ग्रुपने राबविलेल्या ‘मिसेस सावर्डा’ या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी महोत्सवात वेगळीच रंगत आणली. उपस्थित सर्व महिलांमधून चिठ्ठीद्वारे दहा स्पर्धक काढण्यात आले आणि त्यांना सामान्यज्ञान प्रश्‍नोत्तरे, शब्दकोडे,  उखाणे - म्हणी असे प्रश्‍न विचारून बाद फेरीमधून क्रमवारीनुसार नंबर काढण्यात आले. यामध्ये  सरिता कोल्हापुरे, विद्या कुसुमडे, मानसी सावर्डेकर या ‘मिसेस सावर्डा’च्या मानकरी ठरल्या. या तिघींना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. सुमन कोले,  प्राची चव्हाण, वैशाली पाटील, रेणुका राजेशिर्के, अनुष्का काजरोळकर, माधवी पाटील यांना  गुणानुक्रमे क्रमांक देण्यात आले.