होमपेज › Konkan › सावंतवाडी टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात

सावंतवाडी टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात

Published On: Jan 05 2018 1:15AM | Last Updated: Jan 04 2018 11:35PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानकातील दुसर्‍या फेजचे काम अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत 16.31 कोटींची कामे पूर्णत्वास गेली आहेत. केवळ पाणी भरणे सुविधा व दुसर्‍या प्लॅटफॉर्मवरील अतिरिक्‍त तिकीट खिडकीचे काम वगळता सर्व कामे पूर्णत्वास गेली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सुरेश प्रभू यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पदाचा कार्यभार सांभाळताना आपल्या कल्पकतेतून कोकण रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस हाही त्याचाच एक भाग आहे. सावंतवाडी टर्मिनसच्या दुसर्‍या प्लॅटफॉर्मला मंजुरी देऊन त्या कामाला तत्काळ सुरुवातही झाली होती. यामध्ये नवीन प्लॅटफॉर्म, टर्मिनस लाईन, एक लूक लाईन, दोन प्लॅटफॉर्मला जोडणारा पादचारी पूल अशी चार कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमध्ये नूतन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही कार्यतत्परता दाखवली आहे.सावंतवाडी स्थानकावर दुसरा मोठा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. या स्थानकावर गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून सुमारे 55 लाखाच्या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या प्लॅटफॉर्मवर अतिरिक्‍त तिकीट खिडकीचे काम शिल्‍लक आहे. आतापर्यंत सुमारे 90 टक्केहून अधिक काम पूर्ण झाले आहे.