Thu, Jun 27, 2019 04:26होमपेज › Konkan › संगमेश्‍वरला सर्वसाधारण विजेतेपद   

संगमेश्‍वरला सर्वसाधारण विजेतेपद   

Published On: Jan 02 2018 1:09AM | Last Updated: Jan 01 2018 9:52PM

बुकमार्क करा
सावर्डे : वार्ताहर

जिल्हा परिषद, शिक्षण विभाग यांच्या वतीने डेरवण येथील विठ्ठलराव जोशी क्रीडा संकुलावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हिवाळी शालेय क्रीडा स्पर्धेत सांघिक व  वैयक्तिक खेळ प्रकारात 106 गुण मिळवत संगमेश्‍वर तालुक्याला सर्वसाधारण विजेतेपद  तर दापोली ने 40 गुण मिळवत उपविजेतेपद मिळवले.

अंतिम निकाल कबड्डी लहान गट मुले रत्नागिरी विजेता, संगमेश्‍वर उपविजेता, मुलीमध्ये  संगमेश्‍वर  विजेता, खेड उपविजेता, मोठा गट मुले दापोली  विजेता, गुहागर उपविजेता, मुलीमध्ये संगमेश्‍वर  विजेता, खेड  उपविजेता, लंगडी मोठा गट  संगमेश्‍वर विजेता,  खेड उपविजेता लहान गट  संगमेश्‍वर विजेता, चिपळूण उपविजेता, खो - खो मोठा गट  मुले संगमेश्‍वर विजेता, मंडणगड उपविजेता, मुली संगमेश्र विजेता, मंडणगड उपविजेता लहान गट मुले संगमेश्‍वर विजेता, राजापूर उपविजेता मुलीमध्ये संगमेश्‍वर विजेता, राजापूर उपविजेता, क्रिकेट मध्ये गुहागर  विजेता उपविजेता संगमेश्‍वर हे संघ विजयी ठरले.

 वैयक्तिक खेळात धावणे मोठा गट  मुले अक्षय गुरव लांजा विजेता, प्रशांत बालगुडे  उपविजेता, मुलीमध्ये प्रणाली जोशी, दापोली-विजेती, रविना जाबरेे खेड-उपविजेता, लहान गट धावणे मुले जयेंद्र राठोड,राजापूर-विजेता, श्रेयस गुरव, संगमेश्‍वर-उपविजेता, मुली  अमृता म्हापणकर, लांजा-विजेती, रिद्धी  भुवड, दापोली-उपविजेती,  लांबउडी मुले मोठा गट  आदेश बर्जे, दापोली-विजेता, श्‍वेतार्क जाडे, दापोली -उपविजेता, मुलीमध्ये माधवी सेन्गाले, राजापूर -विजेती,  शावानंदी मादगे, संगमेश्‍वर-उपविजेती, लहान गट - मुले  रोशन घुडये,लांजा-विजेता, जयेंद्र राठोड, राजापूर-उपविजेता मुली प्रीति परसराम, लांजा-विजेता, सायली पालसकर, राजापूर-उपविजेती ठरली. उंच उडी मोठा गट  मुले प्रशांत बालगुडे, संगमेश्‍वर-विजेता, सुजल जाधव, दापोली-उपविजेता, मुलीमध्ये रविना खामकर, लांजा-विजेती, तन्वी मल्हार, राजापूर-उपविजेती, लहान गट  मुले नैनेश राजापकर, लांजा-विजेता, पार्थ फणसे, राजापूर-उपविजेता, मुली समृद्धी बामणे,चिपळूण-विजेती, अमृत म्हापणकर,लांजा-उपविजेता, थाळीफेक मोठा गट मुस्तकीन भारदे,  दापोली-विजेता, सोहेल तांबे, मंडणगड-  उपविजेता, मुलीमध्ये अक्षया होळकर शिंदे, लांजा-विजेती, प्रणाली जोशी, दापोली-उपविजेती   लहान गट मुले सुशांत होरंबे, गुहागर-विजेता, सुजल शिंदे, मंडणगड- उपविजेता, 

मुली  सानिका रेवाले,मंडणगड-विजेता, प्रीति परसराम, लांजा-उपविजेता, गोळाफेक मुले मोठा गट  सोहेल तांबे, मंडणगड-विजेता,  मुस्तकीन भारदे,  दापोली-उपविजेता  लहान गट  सुशांत हार्न्बे, गुहागर-विजेता, महेश शेळके,  चिपळूण-उपविजेता. वैयक्तिक खेळाडूंची विभागस्तरावरील  स्पर्धेसाठी निवड झाली आहे.