Wed, Apr 24, 2019 00:00होमपेज › Konkan › सह्याद्री प्राथमिक शाळेत बनविले ‘ई लर्निंग अ‍ॅप’

सह्याद्री प्राथमिक शाळेत बनविले ‘ई लर्निंग अ‍ॅप’

Published On: Mar 14 2018 10:29PM | Last Updated: Mar 14 2018 10:14PMसावर्डे : वार्ताहर

सध्याच्या संगणकीय युगात विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण कमी होण्यासाठी व पाठ्यपुस्तकातील पाठांतर, वाचन याकडे दुर्लक्ष होत आहे. याला पर्याय म्हणून सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेने ‘ई कंटेंट लर्निंग अ‍ॅप विकसित केले आहे. या डिजिटल कक्षाचे संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांच्या हस्ते बटन दाबून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सचिव अशोक विचारे यांची प्रमुख उपस्थित होती.

यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती व गोविंदराव निकम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत शाळेतील विद्यार्थ्यांनी पुस्तक भेट देऊन करण्यात आले. यासाठी सभापती पूजा निकम, विष्णूपंत सावर्डेकर, प्राचार्य रतन कांबळे, अरुण अधटराव, प्रकाश पाटील, महादेव पाटील उपस्थित होते. या अपॅमुळे विद्यार्थांची अभ्यासातील अभिरुची वाढणार आहे. यातून गुणवत्ता वाढीस चालना मिळणार आहे. 

प्रास्ताविकात राजेश कोकाटे यांनी संगणकीय प्रणाली, महाराष्ट्र ज्ञान मंडळ या संस्थेचे कार्य, विस्तार आणि त्या मार्फत विकसित करण्यात आलेली विविध नवनवीन तंत्रज्ञान यांची तांत्रिक माहिती यावेळी दिली. दरम्यान, शाळेतील निवडक मुलांना सहभागी करून त्यांना तंत्रज्ञानाचे धडे देऊन हे अ‍ॅप विकसित केले आहे. यापुढे प्रत्येक विषयाचे विविध पद्याचे असे कंटेंट तयार करून युट्यूबद्वारे विद्यार्थ्यांना देणार असल्याचे मुख्याध्यापक शकील मोडक यांनी सांगितले. सूत्रसंचलन रसिका सुर्वे यांनी केले.